इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नागपूर : नागपूर हिंसाराच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड फहीम खानला अटक केल्यानंतर आता आणखी एका नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. दुसरा मास्टरमाइंड सय्यद असलीम अलीचं नाव समोर आलं आहे. सय्यद असीम अली हा हिंसाचाराचा दुसरा मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टर माईंड फहीम खान आणि सय्यद असीम अली हे एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. सय्यद असीम अलीला कमलेश तिवारी हत्याकांडामध्ये अटक करण्यात आली होती सय्यदचं कनेक्शन समोर आल्यानंतर नागपूर हिंसाचार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील दुसरा मास्टरमाइंडचे नाव समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दुसरा मास्टर माईंड सय्यद असीम अली याने नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूरमध्ये निवडणूक लढवली होती. त्याला 6 हजार मतं मिळाली होती. सय्यद असीम अली हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याला एका हत्या प्रकरणात अटक झाली होती. पण त्याला 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. तो औरंगजेबाचा समर्थक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.