Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजनागपूर हिंसाचारानंतर पुण्यात हाय अलर्ट : पोलीस आयुक्तांनी दिले महत्त्वाचे आदेश..

नागपूर हिंसाचारानंतर पुण्यात हाय अलर्ट : पोलीस आयुक्तांनी दिले महत्त्वाचे आदेश..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटात वाद झाला. यावेळी जमावाला पांगवताना एका गटातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. या पार्श्वभूमीवर आता पुण्यात हाय अलर्ट जारी केला असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. शहरातील बंदोबस्तात वाढ केली असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले असून पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी घडामोडींवर बारकाईने नजर ठेवावे तसेच संवेदनशील भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये काही अनुचित घटना प्रकार घडल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी (क्रमांक 112) संपर्क साधावा असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखेच्या पथकांना शहरात गस्त वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मात्र अफवा पसरवून इतर शहरात त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच पुण्यासह मुंबई पोलीस देखील अलर्ट मोडवर आले आहेत.

दरम्यान आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचारप्रकरणात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना कडक इशारा दिला आहे. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे, त्यांना काही झालं तरी सोडणार नाही आणि पोलिसांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments