इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणाने संपूर्ण राज्यभरासह नागपुरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तब्बल 80 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणातील मास्टरमाइंड फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागपुरातील महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यातून तुफान दगडफेक झाली. वाहनं फोडून आगी लावण्यात आल्या. जाळपोळ झाली. अनियंत्रित जमावाला आवरताना पोलीस, अग्निशमन दलाचे जवानही या हिंसाचारात जखमी झाले. या हिंसाचारामुळे नागपूरच्या अनेक भागात अजूनही संचारबंदी कायम आहे. आता या हिंसाचारामागचा मास्टर माईंड फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबत 50 आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी मध्यरात्री हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान या नागपूर हिंसाचाराच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बांग्लादेशातील दहशतवादी संघटनेचा या नागपूर राडा प्रकरणात सहभाग असल्याच समोर आल आहे. नागपूर हिंसाचाराला कारणीभूत ठरलेले व्हिडिओ इतर देशातील आहेत. सायबर पोलिसांना तपासात हिंसाचार भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडले आहेत. या व्हिडिओंचा IP अड्रेस आणि मोबाइल नंबरचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याच आवाहन केले असून कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.