Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजनवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट; 'गो ग्रीन' निवडा, वीजबिलात १२० रुपये सूट...

नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट; ‘गो ग्रीन’ निवडा, वीजबिलात १२० रुपये सूट मिळवा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : नूतन वर्षाची भेट म्हणून गो ग्रीन से वेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो- ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येते.

मात्र, आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ १२० रुपये एकरकमी सवलत मिळणार आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ई मेलद्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येते. महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना

दरमहाऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्यात येणार आहे. महावितरणच्या तीन कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत चार लाख ६२ हजार म्हणजेच १.१५ टक्के ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळ १२० रुपये एकरकमी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे. संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीनचा पर्याय निवडा, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments