Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजनवीन टर्मिनलवर पीएमपीला जागा नाही! नागरी हवाई राज्यमंत्र्यांच्या सूचनेकडे विमानतळ प्रशासनाचे दुर्लक्ष

नवीन टर्मिनलवर पीएमपीला जागा नाही! नागरी हवाई राज्यमंत्र्यांच्या सूचनेकडे विमानतळ प्रशासनाचे दुर्लक्ष

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाच्या बसला नवीन टर्मिनलमध्ये अद्यापही जागा मिळालेली नाही. एरोमॉल प्रशासन ही जागा देत नाही, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये पीएमपी बसला जागा द्यावी, अशा सूचना खुद्द केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री यांनी विमानतळ प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र, तरीही जागा दिली जात नाही. यामध्ये विमान प्रवाशांना कॅबने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

महामेट्रोची सेवा रामवाडीपर्यंत आहे. वनाझ, पिंपरी-चिंचवड परिसरातून नागरिक रामवाडीपर्यंत विमानतळाकडे जाण्यासाठी येतात. त्यामुळे पीएमपीने रामवाडी मेट्रो स्टेशन ते पुणे विमानतळ मार्गावर बससेवा सुरू केली आहे. मात्र, या बसला नवीन टर्मिनलमध्ये सोडले जात नाही. या बसला एरोमॉलच्या बाजूलाच उभे राहावे लागत आहे. विमान प्रवास करून आलेल्या प्रवाशांना पीएमपी बस दिसत नाही. त्यामुळे त्यांना नाइलाजाने ऑनलाईन कॅब बुक करावी लागत आहे. एरोमॉलमधून खासगी कॅब पकडून जातात. त्यासाठी प्रवाशांना २०० ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, तोच प्रवास पीएमपी व मेट्रोने ५० ते ६० रुपयांमध्ये होऊ शकतो. परंतु, पीएमपी बसला जागा दिली जात नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) रामवाडी ते पुणे विमानतळदरम्यान बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या बसला नवीन टर्मिनलवर परवानगी नसल्याने बस एरोमॉलच्या शेजारी बाहेर थांबविली जात आहे, पीएमपी प्रशासनाकडून बसला नव्या टर्मिनलमध्ये थांबण्यासाठी जागा देण्याची मागणी विमानतळ प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्रदेखील पीएमपी प्रशासनाने विमानतळ प्रशासनाला दिले आहे. तरीही विमानतळ प्रशासनाकडून अद्याप तरी जागा मिळालेली नाही.

प्रवाशांनी हा मुद्दा केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी विमानतळ प्रशासनाला पीएमपीची बस आतमध्ये सोडण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु, त्यानंतर एक महिना झाला तरी पीएमपीला आतमध्ये जागा मिळालेली नाही. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments