Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज नववीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीवर दोन जणांचा बलात्कारः हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा...

नववीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीवर दोन जणांचा बलात्कारः हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; बर्थडेला जायचे म्हणून नेले होते सोबत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवव्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका 15 वर्षीय शाळकरी मुलीला फिरण्यास घेऊन जात असल्याचा बहाणा करताना ओळखीच्या दोन मुलांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

अनुराग साळवे (रा. आनंदनगर, केशवनगर, पुणे) आणि गणेश म्हेत्रे (रा. शिंदेवस्ती, मुंढवा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडितेने हडपसर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी तिच्या आईबरोबर व सावत्र वडीलांबरोबर तसेच आपल्या लहान बहिणीबरोबर हडपसर भागात राहते. तिच्या शाळेत शिकणाऱ्या दोन मैत्रिणीचे मित्र आरोपी यांची त्यांच्यामुळे तिची ओळख झाली होती. दि. 29 जानेवारी रोजी दुपारी पावणेतीन वाजता शाळेतून घरी पिडीत मुलगी आली. सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अनुराग तिच्या घरी आला. त्याने तिच्या वडीलांना त्याच्या बहीणीचा वाढदिवस असल्याचे खोटे कारण सांगितले. तसेच तक्रारदार मुलीला वाढदिवसाला पाठवा असे सांगत वाढदिवस झाल्यावर पुन्हा तिला घरी सोडतो असे म्हणाला.

वडीलांची परवानगी मिळाल्यानंतर अनुरागच्या गाडीवर बसून ती मांजरी येथील झेड कॉर्नर येथील झेड मॉल येथे गेले. तेथे अनुरागचा मित्र गणेश म्हेत्रे व तिचा मित्र आयुष हे भेटले. तेथे काही वेळ थांबल्यानंतर तिघेजण त्या तिघांना त्यांच्या दुचाकीवर बसवून फिरायला नेतो सांगून मांजरी गावात जाणाऱ्या रस्त्याने नेले व मांजरी गावातील नदीच्या पुलाच्या अलीकडील कच्च्या रस्त्याने आतमध्ये गेले. तेथे गप्पा मारल्यानंतर आयुष आणि त्याची मैत्रिण निघून गेले. तेथे अनुराग आणि गणेश व त्यांची मैत्रीण तेथेच थांबलो.

मात्र, त्यांच्या मैत्रिणीला बरे वाटत नसल्याने ती तेथेच झोपले. त्यानंतर अनुराग आणि गणेश यांनी पीडित मुलीचाबरोबर जबरदस्ती करत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तिला तिथेचे सोडून त्यांच्या बरोबर असलेल्या दुसऱ्या मैत्रिणीला घरी सोडतो त्यांनी सांगितले. त्यानंतर ते न आल्याने पिडीतेने चालत चालत मांजरी येथील स्मशानभुमी येथे गेली. पहाटेपर्यंत ती घाबरलेल्या अवस्थेत तेथेच बसली. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता अनुराग दुचाकीवरून तेथे आला. त्याने तिला तिच्या घरासमोर सोडले. याबाबत तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या आई-वडीलांना सांगितल्यानंतर याबाबत बलात्काराचा गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments