Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज नगर-कल्याण महामार्गावर मोटारसायकल झाडाला धडकून एक जण जागीच ठार

नगर-कल्याण महामार्गावर मोटारसायकल झाडाला धडकून एक जण जागीच ठार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बेल्हा (पुणे) : मोटारसायकल झाडाला धडकून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला आहे. याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश अशोक जाधव व समीर बाळू जाधव हे दोघेही पळशी (ता. पारनेर) येथील राहणारे असून, हे दोघेही (दि.१३) रोजी रात्री एक वाजण्याच्या जुन्नर तालुक्यातील शिरोली या गावी काही कामाच्या निमित्ताने मोटारसायकल (क्र.एम.एच.१६.ए.यु. ०१५२) वरून जात होते.

त्यावेळी मोटारसायकल समीर जाधव हा चालवित होता. यावेळी त्यांची मोटारसायकल नगर-कल्याण महामार्गावरील पेमदरा (ता. जुन्नर) येथील गावाजवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडाला जोरदार धडकल्याने, यामध्ये समीर जाधव (वय १९) याच्या डोक्याला व तोंडाला गंभीर मार लागल्याने दुखापत झाली होती, तर प्रकाश जाधव यास कपाळाला व पायाला जोरदार मार लागला. समीर जाधव यास डोक्याला मार लागल्याने, स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता, डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या संदर्भाची फिर्याद प्रकाश जाधव याने आळेफाटा पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

 

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments