Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजनगरपरिषदेने सासवड शहराला दिला पहिला टीडीआर...!

नगरपरिषदेने सासवड शहराला दिला पहिला टीडीआर…!

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवड (पुणे) : सासवड शहरातील कुंजीरवाड्यासमोरील सर्वे नंबर 17 83 व 17 84 ही जमीन ज्ञानेश बंगाळे यांच्या नावे आहे. सदर जागेवर 6 मीटर रुंद रस्त्याचे आरक्षण आहे. सदर प्रकरणी आमदार संजय जगताप, माजी आमदार कै. चंदूकाका जगताप, तसेच आनंदी जगताप यांचा सतत पाठपुरावा सुरु होता की, सदर जागेवरील रस्ता विकसित व्हावा.

या कामी जागा मालक ज्ञानेश बंगाळे हे आनंदी जगताप यांच्या सुचनेनुसार सदर जागा नगरपरिषदेस हस्तांतरण करून देण्यास तयार झाले. परंतु सदर जागेचा काहीतरी मोबदला मिळावा, अशी त्यांची भावना होती. म्हणून नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी विनोद झळक, निखिल मोरे व विद्यमान मुख्य अधिकारी कैलास चव्हाण यांनी सदर जागा मालक यांना टी डी आर देऊन सदर जागा नगरपरिषदेस हस्तांतरण करून घेण्याचे ठरविले. आणि या कामे तांत्रिक मार्गदर्शन नगररचना सहाय्यक निखिल कांचन यांनी केले.

आज गुरुवारी साधारण 345 स्क्वेअर मीटर जागा बंगाळे यांनी नगरपालिकेस विना मोबदला हस्तांतरण करून दिली. या मोबदल्यात नगर परिषदेने बंगाळे यांना जवळपास दहा हजार स्क्वेअर फुट जागा इतकी दिलेली आहे. सदर टी डी आर ची शहरातील विकासकांना विक्री करून बंगाळे यांना मोबदला मिळणार आहे.

आज आनंदी जगताप यांच्या हस्ते सदर प्रमाणपत्र बंगाळे यांना देण्यात आले. सासवड शहरातील पहिला टीडीआर देण्याचे काम नगर परिषदेने केले आहे. यावेळी नगर अभियंता जावेद मुल्ला, अजित जगताप, संतोष गिरमे, संभाजी जगताप, उत्तम सुतार, संजय पवार व इतर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments