Sunday, May 19, 2024
Homeक्राईम न्यूजधैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश 'फिक्स', उमेदवारी मात्र गुलदस्त्यातच!

धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश ‘फिक्स’, उमेदवारी मात्र गुलदस्त्यातच!

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे – महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणच्या लोकसभा जागांबाबतचा महाविकास आघाडी व महायुतीमधील तिढा सुटलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडील माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीच्या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

त्यातच माढ्यातील नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली, त्यानंतर खुद्द पवार यांनीच धैर्यशील हे दोन दिवसात पक्षप्रवेश करणार असल्याचे जाहीर करून टाकले, पण उमेदवारीचा निर्णय मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवला !

भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. पक्षाने उमेदवारी देताना डावलल्याने धैर्यशील मोहिते यांच्यासह मोहिते पाटील घराण्यामध्ये चांगलीच नाराजी पसरली होती. तेव्हापासूनच धैर्यशील मोहिते पाटील हे वेगळी भूमिका घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात राजकीय सूत्रे वेगाने फिरली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट पवार यांच्या मोदीबागेतील निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मोहिते पाटील यांनी “पवार साहेबांचे व आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. आमची ही सदिच्छा भेट होती.

आता वेट अॅण्ड वॉच’ असे सांगत उमेदवारीबाबत बोलण्याचे टाळले. दरम्यान, पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोहिते पाटील हे दोन दिवसात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील, अशी घोषणा केली. मात्र मोहिते पाटील यांच्या उमेदवारीचा निर्णय पवार यांनी गुलदस्त्यातच ठेवला. आता मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा नेमकी केव्हा होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments