इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात धुळवडीनिमित्त इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धुळवडीच्या दिवशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळवडीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल येथील राहणारे तरुण इंद्रायणी नदी पोहण्यासाठी गेले होते दुपारी चारच्या सुमारास सर्व मित्र पाण्यात उतरले मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास काही जण पाण्याच्या मधोमध गेले. यामध्ये रोहित, आकाश आणि विशाल हे इतर दोन मित्रांसह इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेले होते. तिघेजण पाण्यात उतरले. इतर दोघेजण नदीच्या कडेला बसले होते. पोहत असताना तिघांना दम लागला आणि ते बुडाले. तिघेही दिसत नसल्याने इतर दोन्ही मित्रांनी आरडाओरडा केला. पोलीस, अग्निशमन दल आणि एन.डी.आर.एफ आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नांनंतर दोन तासांनी त्यांचा मृतदेह हाती लागला. धुळवडीच्या दिवशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनस्थळी मावळ वन्यजीव रक्षक टीमदेखील दाखल झाली होती. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
धुळवडीचा अतिउत्साह या तरुणांच्या चांगला जीवावर बेतला आहे. रोहित उर्फ गौतम कांबळे, विशाल उर्फ राज दिलीप आचमे आणि आकाश विठ्ठल कोरडे अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नाव आहेत. या घटनेने सर्व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.