इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
होळी सणामुळे 14 मार्च रोजी सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुण्यातील मेट्रो सेवा बंद राहणार आहे.केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट करत हि बातमी दिली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी पोस्ट करत लिहिले की, “धुळवड सणाच्या निमित्ताने पुणे मेट्रो प्रवासी सेवा शुक्रवार, 14 मार्च 2025 रोजी सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहील.
पुणे मेट्रो प्रवासी सेवा दुपारी 3 वाजता पुन्हा सुरू होईल आणि रात्री 11 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे कार्यरत राहील.” दरम्यान, होळी निमित्त नागरिकांना सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार नाही. दुपारी 4 नंतर पुन्हा मेट्रोसेवा सुरळीत होईल.
दरम्यान, पुणे मेट्रो संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी पुणे महानगरपालिका (पीएमसी) स्थानकाजवळील रुळांवर चढून राष्ट्रवादी-सपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली होती. दरम्यान, पुणे मेट्रोने निर्णय घेतला आहे कि, सर्व स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कडक केली जाईल. दरम्यान, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले कि, ते आर्टिफिशियल इंटेलिजेंस/मशीन लर्निंगचा वापर करतील. “जर कोणी मेट्रो प्लॅटफॉर्मवर पिवळी रेषा ओलांडली किंवा ट्रॅकवर उडी मारली तर यामुळे आम्हाला कळेल.