इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे शहरात डेंग्यू, चिकूनगुनिया, झिका आणि मलेरियाची साथ सुरू आहे. कोथरूड भागामध्ये या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पुणे पालिकेकडून या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य प्रकारे काळजी घेत घेतली जात नसल्यामुळे झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आज (सोमवार, दि. ९) चक्क महापालिकेत धुरीकरण मशिन आणत महापालिका परिसरात फवारणी करून पुणे महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केला.
राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आलेल्या या प्रकाराची दिवसभर पालिकेत चर्चा होती. भाजपच्या माजी नगरसेवकाकडून आंदोलन करण्यात आल्याने प्रशासन जागे होऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेईल, अशी संतापजनक भावना भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या वेळी व्यक्त केली.