Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजधारदार कोयता गळ्याला लावून लुटमार करणारा अटक

धारदार कोयता गळ्याला लावून लुटमार करणारा अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : धारदार कोयता गळ्याला लावून तरुणाला लुटून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी 24 जून रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोशी येथील पलाश सोसायटीच्या समोर घडली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ऋषिकेश युवराज बनसोडे (वय-21 रा. साई कॉलनी, लक्ष्मीनगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी साकेत चंद्रशेखर भिमनळे (वय-21 रा. इंद्रायणी पार्क कॉलनी, तुपे वस्ती, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बनसोडे याने त्याच्या हातातील धारदार कोयता फिर्यादी साकेत यांच्या गळ्याला लावला. तसेच त्यांच्या खिशातून पैसे जबरदस्तीने काढून घेऊन रस्त्याच्या कडेला पार्क केलेला टेम्पो आणि इतर पाच वाहनांची कोयता मारुन तोडफोड केली.

आरोपीने कोयता हातात घेऊन आरडाओरडा करत कोयता हवेत फिरवून दहशत माजवली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments