Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजधायरीत टँकरच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

धायरीत टँकरच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे – पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नन्हे- धायरी रस्त्यावर घडली. अपघातानंतर टँकर चालक पसार झाला आहे.

नयन आदेश मारणे (वय २०, रा. धायरी फाटा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत युवराज मारणे (वय ३९, रा. धायरी फाटा) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार नयन गुरुवारी (ता. ११) दुपारी पावणेएकच्या सुमारास धायरी रस्त्यावरील डी मार्टसमोरुन निघाला होता. त्यावेळी भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नयनला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल यादव करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments