इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई | 03 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सर्व मर्यादा ओलांडून आयुष्यातील खास व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला ज्यासाठी अभिनेत्रींनी धर्म बदलला, बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि पूर्ण वेळ कुटुंबाला दिला… अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर…..एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त शर्मिला टागोर यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा रंगलेली असायची. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण लग्नानंतर शर्मिला टागो यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. रिपोर्टनुसार मंसूर अली यांच्यासोबत लग्न केल्यामुळे त्यांनी जीवेमारण्याची देखील धमकी मिळाली.
शर्मिला टागोर आणि मंसूर अली यांच्या लग्नामुळे अनेकांमध्ये नाराजी होती. ज्यामुळे शर्मिला टागोर यांना जीवेमारण्याची देखील धमकी मिळाली होती. मंसूर अली मुस्लीम शाही कुटुंबातील नवाब होते आणि शर्मिला टागोर बंगाली कुटुंबातील असल्यामुळे दोघांच्या कुटुंबियांना त्यांचं नातं मान्य नव्हतं.
आपल्या मुलाचं लग्न कोणत्या अभिनेत्रीसोबत व्हावं अशी मंसूर अली यांच्या कुटुंबियांची इच्छा नव्हती. तर दोघांच्या नात्यासाठी शर्मिला यांच्या कुटुंबियांचा देखील विरोध होता. लग्नानंतर शर्मील टागोर यांनी मुस्लीम धर्माचा स्वीकार केला आणि स्वतःचं नाव बदललं. लग्नानंतर आयेशा सुल्ताना अशी अभिनेत्रीला ओळख मिळाली.
लग्नानंतर काही वर्षांनंतर शर्मिला टागोर यांनी झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. शर्मिला टागोल यांनी ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘आमने- सामने’, ‘चुपके-चुपके’ यांसारख्या असंख्य सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही शर्मिला टागोर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.
शर्मिला टागोर यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी ‘गुलमोहर’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक वर्षांनंतर शर्मिला टागोर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शर्मिला टागोर आणि त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
‘अॅन इव्हनिंग इन पॅरिस’ सिनेमात शर्मिला टागोर यांचा बिकिनी लूक
१९६७ मध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी ‘अॅन इव्हनिंग इन पॅरिस’ या सिनेमात बिकिनी घालून अक्षरश: धुमाकूळ घातला होता. शर्मिला टागोर म्हणाल्या, एका मध्यरात्री त्यांना घराजवळील पोस्टर हटवावे लागले होते. शर्मिला यांच्या सासू त्यावेळी शहरात येणार होत्या. म्हणून ड्रायव्हरला सांगून त्यांनी घराजवळील सर्व बिकिनीचे पोस्टर्स हटवण्यास लावले होते. मात्र एअरपोर्टच्या मार्गावर इतरही पोस्टर असतील, हे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं.