Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज धनादेश न वटल्याने संचालकाला तीन कोटीचा दंड, लष्कर न्यायालयाचे आदेश

धनादेश न वटल्याने संचालकाला तीन कोटीचा दंड, लष्कर न्यायालयाचे आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : धनादेश न वटल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकाला एकूण रक्कमेच्या दुप्पट तब्बल 3 कोटी 2 लाख 77 हजार 700 रुपयांचा दंड व त्यावर दरमहा 9 टक्के व्याज द्यावे असा आदेश लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी धनाजी जयसिंग पाटील यांनी दिला आहे. तसेच दंड रकमेचा भरणा न केल्यास तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ऍक्ट च्या कलम 138 अन्वये विजय खाडे यांनी जयहिंद पॉलिमर प्रा.लि व इतर यांच्याविरुद्ध एक कोटी 51 लाख 38 हजार 850 रुपये रकमेचा धनादेश न वटल्याने लष्कर न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. फिर्यादी खाडे यांनी जयहिंद पॉलिमर प्रा.लि जुन्नर तालुका औद्योगिक, सहकारी वसाहत येथील कंपनी चालविण्याकरिता घेतली होती. कंपनीचे खाते हे फिर्यादी बघत होते. राज्यातील जिल्हा परिषदांना पीव्हीसी पाईप बनवून तो विकण्याचा व्यवसाय कंपनी करीत होती. एक वर्ष कंपनीने पाईप पुरवठा केल्यानंतर फिर्यादींनी कंपनीचे कामकाज करण्याचे थांबविले होते. बँकेचे सर्व व्यवहार परत कंपनी व त्यांचे संचालक पाहू लागले.

त्यामुळे मागील वर्षी जो काही व्यवहार कंपनीने परस्पर जिल्हा परिषदांकडून उचलले होते. फिर्यादी यांना धनादेश रक्कम येणे बाकी असल्याचे कंपनीस कळविले असता कंपनीने त्यांना धनादेश दिला होता. तो धनादेश फिर्यादींनी बँकेत भरला असता न वटता परत आला होता. तेव्हा फिर्यादी यांनी लष्कर न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात फिर्यादीच्या वकिलांनी दाखल केलेले साक्षीपुरावे व लेखी युक्तिवाद ग्राहय धरुन न्यायालयाने कंपनीचे संचालक देवीचंद भरत तांबे यांना फिर्यादीला दंडाची रक्कम देण्याचा आदेश दिला.

फिर्यादीच्या बाजूने ऍड विजयकुमार ढाकणे, ऍड राणी विजयकुमार ढाकणे व त्यांचे सहकारी ऍड सिद्धार्थ जाधव व ऍड सारिका पोटभरे यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

Recent Comments