इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः धनकवडी परिसरात मंगळवारी (22 जुलै) मध्यरात्री वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी तीन आरोपी अल्पवयीन आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही घटना मंगळवारी मध्यरात्री 11.45 ते पहाटे 1 वाजेदरम्यान घडली होती. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक आणि नवनाथ नगर या भागांमध्ये काही अज्ञात युवकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या 15 रिक्षा, 3 कार आणि 2 स्कूल बसेससह 20 पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड केली होती.
घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि स्थानिकांच्या मदतीने पोलीसांनी काही तासांतच पाच आरोपींना अटक केली.
पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. या प्रकरणामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस त्याचा सखोल तपास करत आहेत.