Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजधनकवडीत तरुणाचे टोकाचे पाऊल, गळफास घेत केली आत्महत्या; महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

धनकवडीत तरुणाचे टोकाचे पाऊल, गळफास घेत केली आत्महत्या; महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील धनकवडी भागात एका तरुणाने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची घटना समोर आली आहे. सनी रमेश आठवले (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुंदन बाबुराव आठवले (वय ५२, रा. ओगलेवाडी, जि. सातारा) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी आठवले हा वर्षभरापासून एका महिलेसोबत राहत होता. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाचे खटके उडत असल्याची माहिती त्याने नातेवाईक कुंदन आठवले यांना दिली होती. महिलेचे नातेवाईकही त्याला धमकी देत होते.

बुधवारी मध्यरात्री सनी याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती कुंदन आठवले यांना मिळाली. त्यांनी सनीच्या मित्रांकडे याबाबत चौकशी केली. त्यानंतर ते पुण्यात आले आणि त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. सनी याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कुंदन यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments