Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजधनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, त्यांनी किती सोसावं?'; महंत नामदेव...

धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, त्यांनी किती सोसावं?’; महंत नामदेव शास्त्रींकडून पाठराखण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बीड : गेल्या अनेक दिवसांपासून बीडचे राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेवर अनेक आरोप करण्यात येत आहेत. याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांकडून होत आहे. याचसोबत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहोत, असं महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

‘भगवानगड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे. धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे’. महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपामुळे सांप्रदायाचे नुकसान

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने सांप्रदायाचे नुकसान आहे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मिडियाने दखल का घेतली नाही? मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे. पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव की मुंडे गुन्हेगार नाही. त्यांनी किती सोसावं? असंही नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments