Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजधनंजय मुंडेंनंतर कृषिमंत्री कोकाटेंचीं विकेट पडणार? आज होणार फैसला

धनंजय मुंडेंनंतर कृषिमंत्री कोकाटेंचीं विकेट पडणार? आज होणार फैसला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता अजित पवार गटाच्या आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असल्याची चर्चा होत आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यानां सरकारी कोट्यातील फ्लॅट फसवणूक करून घेतल्याच्या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली. या शिक्षेच्या स्थगिती प्रकरणी नाशिक कोर्टात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत कोकाटेंचे कृषिमंत्री पद राहणार की जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांचा आज नाशिक कोर्टात फैसला होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयावर कोकाटे यांचे पुढील राजकीय भवितव्य ठरणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर शासकीय कोट्यातील घरे फसवणुकीने मिळवल्याचा आरोप आहे. सकाळी 11.30 दरम्यान नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे नंतर कृषिमंत्री कोकाटेंचीं विकेट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने 1955 मधील एका प्रकरणात दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाचीं शिक्षा सुनावली आहे. यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांनी दोन वर्षाच्या शिक्षणात स्थगिती मिळावी यासाठी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर या प्रकरणातील न्यायालयाने निकाल राखून ठेवला. कोकाटे यांच्या विरोधातील वकिलांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी पाच दिवसांची मुदत देखील दिली होती. आता या शिक्षेच्या स्थगिती प्रकरणी नाशिक कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार की पद वाचणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहील आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments