Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजधनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात; आज होणार फैसला !

धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात; आज होणार फैसला !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी संपतील अशी शक्यता वर्तवली जात असताना आणखीन एका प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. पत्नी करुणा शर्मा यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज परळी न्यायालयात होणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांची आमदारकी राहणार की जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

करुणा शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2024 च्या परळी विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी त्यांच्याबाबत माहिती दिली होती. त्यात पत्नी राजश्री मुंडे, तीन मुले आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. पण करुणा शर्मा यांच्या नावावर असलेल्या संपत्तीचा कोणताही उल्लेख त्यांनी त्या शपथपत्रात केला नव्हता. त्यामुळे धनंजय मुंडेंनी संपत्तीची माहिती लपवली असल्याचा आरोप त्यांनी केला. या अंतर्गत करुणा शर्मा यांनी परळीतील फौजदारी न्यायालयात ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. आज या या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याने धनंजय मुंडे यांचे उत्तर काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या धनंजय मुंडेंच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments