Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजधक्कादायक...! १४ वर्षीय अल्पवयीन मुलाची आत्महत्या; शिरूर तालुक्यातील घटना

धक्कादायक…! १४ वर्षीय अल्पवयीन मुलाची आत्महत्या; शिरूर तालुक्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

तळेगाव ढमढेरे, (ता. शिरूर): शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलाने गोठ्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी २२ मी रोजी तळेगाव ढमढेरे येथील जगताप वस्ती येथे घडली. युवराज कांतीलाल जगताप (वय-१४) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत कांतीलाल चंद्रकांत जगताप (वय ४१, रा. जगताप वस्ती, तळेगाव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांतीलाल जगताप हे जागरणच्या कार्यक्रमाला बुधवारी गेले होते. रात्री उशिरा घरी आल्यानंतर त्यांना मुलगा युवराज घरात दिसला नाही. त्यामुळे त्यांनी परिसरात तसेच आजूबाजूला त्याचा शोध घेतला असता तो घराशेजारील गोठ्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments