इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी आज (२६ फेब्रुवारी) स्वारगेट बसस्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांच्या केबिनच्या काचा फोडल्या आहेत.
अधिक माहिती अशी की, स्वारगेट डेपोत तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर प्रवाश्यांकडून आणि स्थानिक नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. माजी नगरसेवक वसंत मोरे आणि शिवसैनिकांनी स्वारगेट बसस्थानक परिसरातील जुन्या बस मध्ये शेकडो कंडोम सापडले असल्याचे म्हणत तोडफोड केली. मग या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची केबिन असून हा प्रकार घडत असल्याचा सवाल करत त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या केबीनच्या काचा फोडल्या.
वसंत मोर म्हणाले, आजच्या घटनेला जर कुणी कारणीभूत असेल तर ते सुरक्षारक्षक आहेत. येथे २० सुरक्षारक्षक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या घटनेमध्ये सुरक्षा रक्षकही सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वसंत मोरे म्हणाले, येथे ठिकाणी सुरक्षा रक्षक काय करतात? जुन्या बंद पडलेल्या शिवशाही एसटीमध्ये शेकडो कंडोम्स दिसत आहेत. तेथेच महिलांच्या साड्या, अंतर्वस्त्र, दारुच्या बाटल्या, बेडशीट पडलेले आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या संमतीने येथे दररोज हे प्रकार घडत आहेत. सुरक्षा रक्षकच या प्रकारामध्ये सामील आहेत.
या बंद बस आहेत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयासमोरूनच जावं लागतं. तरीही अशा घटना कशा घडतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.