Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजधक्कादायक..! स्वारगेट बस डेपोतील 'त्या' शिवशाही बसबाबत 'ही' माहिती आली समोर

धक्कादायक..! स्वारगेट बस डेपोतील ‘त्या’ शिवशाही बसबाबत ‘ही’ माहिती आली समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः शहरातील स्वारगेट बस डेपोत शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना स्वारगेट बस स्टेशन येथे पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. सध्या पीडित तरुणीची पुण्यातील ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. या वैद्यकीय चाचणीचा अहवाल संध्याकाळपर्यंत मिळणार आहे.

बसच्या दरवाजाला लॉकच नाही

या प्रकरणी आता स्वारगेट येथील बस डेपोमध्ये ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला आहे, त्या बसबाबत एक मोठी बाब समोर आली आहे. ज्या बस मध्ये बलात्कार झाला ती शिवशाही बस दुसऱ्या डेपोची असल्याचे समोर आले आहे. ही बस दुसऱ्या ठिकाणाहून ही बस आलेली होती. या बस बाबत धक्कादायक बाब म्हणजे, या बसच्या दरवाजाला कसल्याही प्रकारचं लॉक नसल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर आतल्या केबिनच्या दरवाजाला देखील लॉक नसून एक दोरी बांधल्याच उघडकीस आलं आहे. त्यामुळे आता महामंडळाच्या बस मध्ये महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल प्रवाश्यांकडून आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या..

या धक्कादायक प्रकारवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या, ” पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. राज्यातील अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. आतापर्यंत पुण्यात मुली नेहमीच सुरक्षित राहिल्या आहेत. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments