Saturday, June 14, 2025
Homeक्राईम न्यूजधक्कादायक...! साडेपाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; दौंड तालुक्यातील घटना

धक्कादायक…! साडेपाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; दौंड तालुक्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दौंड, (पुणे): कुरकुंभ (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत एका साडेपाचवर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर 27 वर्षीय तरुणाने लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (ता.16) दुपारी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीवर दौंड पोलीस ठाण्यात पो.स्को कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ चंद्रकांत रिठे (वय-27, धंदा ड्रायव्हर, मुळ रा. शेरेचीवाडी, ता. फलटण जि. सातारा) असे नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत बालिकेच्या वडिलांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत कुरकुंभ हद्दीत भागवतवस्ती येथील एका किराणा दुकानासमोरून पिडित बालिकेचे आरोपी नामे नवनाथ चंद्रकांत रिठे याने अपहरण केले.

अपहरण करून घेवून जावून कुरकुंभ येथील असलेल्या उसाच्या शेतात नेउन बळजबरीने बालिकेच्या अंगावरील कपडे काढून मारहाण करीत तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी नवनाथ रिठे याच्यावर गु. रजि नं 353/2025 भा. न्या. संहिता कलम 65(2),137(2),115 (2) पो. स्को कलम 4,6,8,10,12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments