Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज धक्कादायक! शॉपिंग मॉलजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार, ब्लॅकमेलिंग

धक्कादायक! शॉपिंग मॉलजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार, ब्लॅकमेलिंग

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नोएडा : महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे बनवूनही अजूनही महिलांविरोधात गुन्हे घडत आहेत. देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात महिलांना अत्याचार, छळ याचा सामना करावा लागतोय. अलीकडेच एका महिलेवर पाच जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये नोएडा येथे शॉपिंग मॉलजवळ ही घटना घडली. या प्रकरणात तिघांना अटक झाली आहे. दोघे जण अजून फरार आहे. यात मुख्य आरोपी स्थानिक बाहुबली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी ही सामूहिक बलात्काराची घटना घडली. गुन्हेगार दबंग असल्याने पीडित महिलेने लगेच पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली नाही. पोलिसांनी ही माहिती दिली. आरोपींनी तिला ब्लॅकमेल करुन छळ सुरु केला. त्यानंतर तिने पोलीस स्थानकात धाव घेतली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.

कधी पोलिसात तक्रार नोंदवली?

“30 डिसेंबरला सेक्टर 39 मधील पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यात आला, त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली” अशी माहिती पोलीस प्रवक्त्याने दिली. “राजकुमार, आझाद आणि विकास अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. रवी आणि मेहमी हे दोघे फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु आहेत” असं पोलीस प्रवक्त्याने सांगितलं. अटक केलेल्या आरोपींना स्थानिक कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments