इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
वाशिमः जिल्ह्यात मागील २४ तासात लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना घडल्या आहेत. येथे महाविद्यालयीन तरुणीवर अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार करण्यात आले आहेत. यामुळे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. वाशिम शहरात एका सहा वर्षीय चिमूकलीवर लैंगिक आत्याचाराची घटना घडल्यानंतर २४ तासाच्या आत दुसरी घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, पहिल्या घटनेत संध्याकाळच्या वेळेस ७वर्षीय चिमुकली आईस्क्रिम आणण्यासाठी दुकानात गेली होती. तेंव्हा एका १९ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शेतात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दरम्यान, ही घटना ताजी असताना, दुसरीकडे वाशिमच्या रिसोड शहरातील वाशिम रस्त्यावर एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. मी तुझ्या मामाच्या ओळखीचा आहे. मला तुझ्या मामाने घेऊन यायला सांगितलं आहे असं म्हणत मुलीला रिक्षामध्ये बसवून शेतात नेत अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पीडित मुलगी घरी गेली असता तीने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी याप्रकरणी रिसोड पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.