इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातील कल्याणीनगर भागातुन धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणीनगरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला आहे. त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर महादेव भोई (वय २६, रा. वाघोली) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गौरी झोरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. कल्याणीनगर भागातील ‘द स्पा व्हिला’ या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी केलेल्या कारवाईत पोलिसांना अनेक महिला आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी मसाज पार्लरमधून महिलांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी अधिक केलेल्या चौकशीत आरोपी ज्ञानेश्वर भोई याने महिलांना पैशांचे आमिष दाखवले आणि त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर करत आहेत.