इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
छत्रपती संभाजीनगरः घराबाहेर लघुशंकेसाठी गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्याच भागातील २२ वर्षीय रिक्षाचालकाने ओढत नेऊन अत्याचार केला. आरडाओरड झाल्यावर त्याने मुलीला सोडले. बीड बायपास भागात शुक्रवारी (दि. ४) पहाटे ३ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून शनिवारी (दि. ५) पोलिसांनी आरोपीला अटक केली. रिझवान पटेल (२२) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली.
१३ वर्षीय पीडितेच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, ४ एप्रिलला पहाटे ३ वाजता पीडिता लघुशंकेसाठी उठली. घराबाहेर असलेल्या बाथरुमकडे गेल्यावर आरोपी रिझवानने तिला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरी ओढत स्वतःच्या घरात नेले. तेथे तिच्यावर जबरी अत्याचार केला. काही वेळातच पीडिता रडत घराकडे आली. आई-वडिलांनी पीडितेची विचारपूस केल्यावर तिने रिझवानने त्याच्या घरात ओढत नेऊन गैरकृत्य केल्याचे सांगितले.
वैद्यकीय तपासणीनंतर वाढले कलम
या प्रकारामुळे पीडितेसह तिचे कुटुंबीय भेदरले. त्यांनी पोलिसांत धाव घेतल्यावर बीएनएस ७४ (विनयभंग), धमकावणे ३५१ (२), पोक्सो ८, १२ नुसार गुन्हा नोंद केला. पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यावर त्यात अत्याचार केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी बलात्काराचे कलम वाढविले. लगेचच तपास करून आरोपी रिझवान पटेल याला बेड्या ठोकल्या. महिला पोलीस उपनिरीक्षक अनिता बागुल तपास करीत आहेत.