Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजधक्कादायक..! मुलीसाठी वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक; हडपसर...

धक्कादायक..! मुलीसाठी वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक; हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैद्यकीय प्रवेशाचं आमिष दाखवून एका व्यावसायिकाची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मगरपट्टा सिटी भागात वास्तव्यास असणाऱ्या एका व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फसवणुकी प्रकरणी हडपसर पोलिसांनी सुनील कुमार (वय ४५), सौरभ गुप्ता (वय ४०), विकास गुप्ता (वय २८), रणधीर सिंग (वय ३०), प्रियांका मिश्रा यांच्या बरोबरच अजून एकाविरुद्ध अश्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय प्रवेशाचं आमिष दाखवून एका व्यावसायिकाची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मगरपट्टा सिटी भागात वास्तव्यास असणाऱ्या एका व्यावसायिकाच्या मुलीला वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. व्यावसायिकाची एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत आरोपींशी परिचय झाला होता. आरोपी हे मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये वास्तव्याला आहेत. वर्षा पूर्वी आरोपींनी व्यावसायिकाच्या मुलीला एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर व्यावसायिकाकडून आरोपींनी ६० लाख रुपये घेतले होते.

अधिक माहिती अशी की, व्यावसायिकाने आरोपींना पैसे दिल्यानंतरही व्यवासायिकाच्या मुलीला वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून दिला नाही. त्यानंतर व्यावसायिकाने आरोपिंकडे विचारणा केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. मग व्यावसायिकाने आरोपीला पैसे परत मागितले. तेंव्हाच व्यवसायिकाचा संशय बळावत होता. सुरुवातीला आरोपींनी २० लाख रुपये परत केले मात्र उरलेले ४० लाख रुपये दिले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments