इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यात घडलेली एक घटना समोर आली आहे. ज्यात दोन मित्र दारु प्यायला बसले असता त्यांच्यात वाद झाला. झालेल्या वादातून मित्रानेच दुसऱ्या मित्राचा पहार घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवीन प्रसाद असे मृताचे नाव आहे. तर बिरन सुबल असे आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्याच्या तपासात रक्ताने माखलेला मोबाईलची मदत झाली. या घटनेबाबत पुण्याच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी माहिती दिली. पोलिसांनी आरोपी बिरन सुबल कर्माकर याला पश्चिम बंगालमधील हावडा येथून अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, ही घटना ८ फेब्रुवारीच्या रात्रीची आहे. दोघेही आंबेगाव पठार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत मद्यपान करत बसले होते. मद्यप्राशन केल्यानंतर बिरन सुबल याला घटस्फोटीत पत्नीची आठवण आली. त्याने तिला फोन केला असता तिने उचलला नाही. फोन उचलला नसल्याचे पाहून नयन प्रसाद याने खालच्या भाषेत कमेंट करत बिरेन सोबत चेष्टामस्करी केली होती. यातून दोघांमध्ये वाद झाला. राग अनावर झाल्याने बिरनने शेजारीच पडलेली लोखंडी पहार घेऊन नवीन प्रसाद याच्यावर वार केला असता. या घटनेत नवीन प्रसादचा जागेवरच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी बिरन पुण्यातून पळून तो त्याच्या मूळ राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये गेला होता. त्यानंतर, हे दोघेही कामानिमित्त पुण्यात आले होते. पुण्याच्या कात्रज परिसरात राहत होते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला होता. मृतदेह सडू लागल्याने मयताची ओळख पटत नव्हती. खून झालेला व्यक्ती आणि आरोपी कोण याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान होते. मात्र, त्याठिकाणी रक्ताने माखलेला एक मोबाईल पोलिसांना सापडला. या मोबाईलच्या आधारे तांत्रिक तपास करत पोलिसांनी आरोपी बिरन सुबल कर्माकर याला पश्चिम बंगालमधील हावडा याठिकाणी जाऊन अटक केली आहे.