इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामतीः शहरात रेल्वे खाली येऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारामतीमधील मेहता मल्टीकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पासून काही अंतरावर ही घटना घडली आहे.
ही घटना आज (१३ फेब्रुवारी) दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घडली आहे. बारामतीकडून दौंड च्या दिशेने रेल्वे जात असताना रेल्वेखाली सापडल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे. अद्याप या या महिलेची ओळख पटलेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.