इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातील सिंहगड परिसरातून एक महत्वाची घटना समोर आली आहे. पोलीस अधिकारी असल्याचे सांगून एका महिलेचे सहा लाख रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली आहे. यानंतर महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड परिसरातून एका महिलेला पोलिस असल्याची बतावणी करून दागिने लुटल्याची घटना घडली आहे. तक्रारदार महिला वडगाव बुद्रुक परिसरातील एका मंगल कार्यालयात विवाह निमित्त आली होती. विवाह समारंभ संपन्न झाल्यानंतर त्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास मंगल कार्यालयातून निघाल्या होत्या. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्याने खाकी रंगाची पँटघातलेली होती. त्यांनी महिलेकडे पोलीस असल्याचे सांगितले.
तसेच या भागात महिलांकडील दागिने चोरीला जाण्याच्या घटना वाढत आहेत. अंगावरले दागिने काढून पिशवीत ठेवा अशी बढाई मारली. त्यानंतर महिलेने दागिने पिशवीत ठेवले. मग महिलेने पिशवीत दागिने ठेवले की नाही याचा तपास करण्यासाठी महिलेकडील पिशवी चोरट्यांनी घेतली आणि महिलेला कळू न देता दागिने चोरून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे अधिक तपास करत आहेत.