Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजधक्कादायक ! दारुच्या नशेत एका महिलेसह दोन मुलांवर वार; इंदापूर येथील घटना

धक्कादायक ! दारुच्या नशेत एका महिलेसह दोन मुलांवर वार; इंदापूर येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर : एका व्यक्तीने दारूच्या नशेत एका महिलेसह दोन लहान मुलांवर वार करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भांडगाव (ता. इंदापूर) येथे गुरुवारी (दि. 27) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी सुरेश उमाजी मदने उर्फ गोट्या यास इंदापूर पोलीसांनी अटक केली आहे.

सदर घटनेत सोनाली श्याम जाधव (वय अंदाजे 28 वर्ष रा. भांडगाव ता. इंदापूर) तसेच त्यांचा मुलगा शिवांश श्याम जाधव (वय 2 वर्ष) तसेच प्रियल लक्ष्मण चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत

या हल्ल्यात प्रियल लक्ष्मण चव्हाण या लहान मुलीच्या मानेवरती वार झाल्याने तिला तातडीने पुढील उपचारासाठी अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सोनाली जाधव व शिवांश जाधव यांच्यावर इंदापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत इंदापूर पोलीसांकडून अधिक तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments