Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजधक्कादायक : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, पण थोडक्यात बचावला

धक्कादायक : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, पण थोडक्यात बचावला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही वर्षांत राज्यात गुन्हेगारीच्याघटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आता छत्रपती संभाजीनगर शहरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे,. भर दिवसा कुख्यात गुन्हेगाराकडून रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडी चौकात एक रिक्षा चालक नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला थांबून प्रवाशांची वाट पाहत होता. त्याचवेळी एक कार जाधववाडी सिग्नलकडून वळण घेत असताना त्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. रिक्षा चालकाने कार थांबवायला सांगितल्यावर कार मधील कुख्यात गुंडाने रिक्षा चालकास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकच नव्हे तर त्यांने धारदार कोयत्याने त्याच्यावर जीवघेणा वार केला. मात्र प्रसंगावधान राखत रिक्षा चालकाने वार चुकवला आणि तिथून पळ काढल्याने त्याचा थोडक्यात जीव बचावला.

संजय गायकवाड असं रिक्षा चालकाचे नाव आहे. तर कोयत्याने हल्ला करणाऱ्या कुख्यात गुंडाच सय्यद फैजल उर्फ तेजा सय्यद असं नाव आहे. भर दिवसा घडलेला संपूर्ण थरारक प्रकार जवळच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला त्यामुळे पोलिसांना तपासास मदत मिळाली. याप्रकरणी सिडको पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आणि गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी तत्परता दाखवली. पोलिसांनी आता आरोपीच्या मुसक्या आवळल्या..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments