Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजधक्कादायक...! खाऊच्या आमिषाने 5 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; राजगुरूनगर येथील घटना

धक्कादायक…! खाऊच्या आमिषाने 5 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; राजगुरूनगर येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

राजगुरुनगर, (पुणे) : पुणे शरासह जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेतच. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. असं असताना आता खाऊचे अमिष दाखवून एका पाच वर्षीय मुलावर अनैसिर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आज (दि. २२) दुपारच्या सुमारास राजगुरूनगर शहरातील माळीमळा येथे घडली आहे.

याप्रकरणी एका व्यक्तीला खेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय बाळु ताठोड उर्फ गोल्या (वय २४ रा. माळीमळा, राजगुरूनगर, ता. खेड) असं अटक केल्येल्या नराधमाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी राजगुरूनगर शहरातील माळीमळा येथील घुमटकर यांचे चाळीजवळच घरासमोर फिर्यादी यांचा मुलगा खेळत होता. त्यावेळी तुला खावू देतो, असे सांगून आरोपीने मुलावर जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकारची माहिती मिळताच कुटुंबांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीवर बाल लैगिंक अत्याचार अधिनियम 2012 कलम 4,6,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल राजे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments