Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजधक्कादायक ! इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे चाकूने सपासप वार करून महिलेचा...

धक्कादायक ! इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे चाकूने सपासप वार करून महिलेचा खून; आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निमगाव केतकी या गावात चाकूने सपासप वार करुन ३३ वर्षीय महिलेचा खून करण्यात आला आहे. सुनिता दादाराम शेंडे असं खून झालेल्या महिलेचे नांव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर (रा. सुरवड ता. इंदापुर जि. पुणे) याच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्वतःहून इंदापूर पोलीस स्टेशनला हजर झाला होता. ही घटना दि.०४ डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी सराफवाडी रोडवरील अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते साडे आठ च्या सुमारास ज्ञानेश्वर बबन रासकर यांनी अज्ञात कारणामुळे सुनिता दादाराव शेंडे यांच्या डोक्यात, पोटावर, छातीवर, हातावर चाकूने वार केले. यात सुनिता शेंडे यांचा जागीच मृत्यू झाला. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गावडे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments