इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
जालना : जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेमध्ये पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना जालनामधील भाटेपुरी गावात घडली आहे. कौटुंबिक वादातून पती आणि पत्नी दोघांमध्ये भांडणं झाली होती. रागाच्या भरात पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. असं पोलीस तपासात समोर आलं आहे.
पत्नी वंदना कावळे असं मृत महिलेचे नाव आहे तर गजानन कावळे असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना तालुक्यातील भाटेपुरी गावात एक जोडपं राहत होतं. गजानन कावळे असं पतीचं नाव तर, पत्नी वंदना कावळे असं मृत पत्नीचं नाव आहे. दोघांचा संसार सुरू होता. पण नवऱ्याला दारूचं व्यसन असल्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणं होत असत. एकदा कौटुंबिक वादातून दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं. याच टोकाच्या भांडणामुळे नवऱ्यानं बायकोची हत्या करण्याचं ठरवलं.
आरोपी पतीनं रागाच्या भरात पत्नीचा गळा जोरात आवळला. यादरम्यान पत्नीचा श्वास कोंडला गेला. ज्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मौजपूरी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.