इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दौंड : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई केली असून, चार वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन महिलांसह 7 जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या प्रकरणात, मुक्ता पोपट गायकवाड (रा. वडारगली, दौंड) हिच्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची 10 लिटर तयार दारू साठवून ठेवली होती. पोलीस हवालदार रेश्मा वाबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) अंतर्गत दाखल करण्यात आली आहे. दुसऱ्या कारवाईत, कल्पना शाम जाधव (रा. गोवागली, दौंड) हीने आपल्या घराच्या आडोशाला 20 लिटर गावठी हातभट्टी दारू साठवून विक्री करत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तिसऱ्या प्रकरणात, गांधी चौक, दौंड येथे एका बंद घराच्या पाठीमागे मुन्ना इकबाल शेख, अशोक रामा गुपुते, शुभम भीमसेन वांभिरे आणि आकाश मॅगनकेरी हे जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्याकडून 1 हजार 250 रुपये रोख आणि जुगाराच्या दोन कॅट पत्यांचा जप्तीचा माल मिळून आला. त्यानुसार महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
चौथ्या कारवाईत, सोहेल अन्वर सय्यद (रा. शालीमार चौक, दौंड) हा कुरकुंभ मोरी येथे एका टपरीच्या आडोशाला कल्याण मटका जुगार चालवत असताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 475 रुपये रोख आणि जुगाराच्या चिठ्ठ्या हस्तगत करण्यात आल्या. त्यानुसार मुंबई जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) अंतर्गत नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, ही संपूर्ण कारवाई दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार घाडगे पोलीस हवालदार शेख व वाबळे करत आहेत