इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
राहुलकुमार अवचट / यवत: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू असून अनेक सरकारी कर्मचारी आपले मतदान केंद्र सोडून इतरत्र कर्तव्यावर रुजू असल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी आज दौंड येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दौंड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कर्तव्यावर कार्यरत असलेल्या 1 हजार 3 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत तुकडोजी विद्यालय, एसआरपीएफ कॅम्प येथे टपाली मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली आहे.
विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याकडून नमुना 12 भरुन घेण्यात आले होते. टपाली मतदानाकरीता संत तुकडोजी विद्यालय एकूण 3 टपाली मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली. यावेळी निवडणुक कर्तव्यावर असलेल्या 1 हजार 3 अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 408 पोलीस कर्मचारी सहभागी होते. टपाला मतदान प्रक्रियेकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत काळे, टपाली मतदान नोडल अधिकारी दिनेश अडसूळ व सहायक पोपट कुंभार यांनी नियोजन केले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मरकड यांनी दिली.