Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजदौंडमधील शालेय विद्यार्थिनींवरील अत्याचार प्रकरण; मुख्याध्यापकासह शिक्षकाला ७ दिवसांची पोलीस कोठडी

दौंडमधील शालेय विद्यार्थिनींवरील अत्याचार प्रकरण; मुख्याध्यापकासह शिक्षकाला ७ दिवसांची पोलीस कोठडी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दौंड : मळद (ता. दौंड) येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील आठ ते नऊ विद्यार्थिनींचे शाळेतील शिक्षकानेच लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता. २२) उघडकीस आला आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षकाला गुरुवारी मध्यरात्री मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी शिक्षक बापूराव धुमाळ व मुख्याध्यापक सुभाष भीमराव वाखारे असे कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात आरोपी बापूराव धुमाळ हा इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत आहे. आरोपी बापूराव धुमाळ याने सातवी, आठवी आणि नववीमध्ये शिकत असणाऱ्या आठ ते नऊ विद्यार्थिनींना व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करत अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

दरम्यान, हा प्रकार पालकांना समजल्यानंतर शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. या घटनेची माहिती मिळताच, दौंड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी फरार झाला होता. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी मुख्य आरोपी बापूराव धुमाळ याला पकडण्यासाठी पथक तयार करून आरोपीच्या मागावर पाठवले होते. पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना ७ दिवसांची (29 ऑगस्ट पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments