इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा या चित्रपटाने धुमाकूळ घातला असून या चित्रपटामध्ये दौंडच्या श्रद्धा सदानंद थोरात यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळी आहे. कार्यकारी निर्माता हे पद कोणत्याही फिल्मचे परियोजनेतील इतर पदांच्या तुलनेत उच्च दर्जाचे मानले जाते. दौंड च्या लेकीने आगळ्या वेगळ्या क्षेत्राची निवड करून अत्यंत कमी वयामध्ये चित्रपट निर्मितीमध्ये मोठी जबाबदारी पार पाडली आहे. यामुळे चित्रपट क्षेत्रात दौंडचे नाव महाराष्ट्रभर पोहचवले असून श्रद्धा थोरात यांच्यावर संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
श्रद्धा थोरात या दौंड तालुक्यातील केडगाव (बोरीपार्धी) येथील स्वर्गीय माजी आमदार काकासाहेब थोरात यांच्या नात व भीमा पाटसचे माजी व्हाईस चेअरमन आनंद थोरात यांची पुतणी व माथाडी कामगार नेते सदानंद थोरात यांची कन्या आहेत. या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा प्रथमच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली असून त्यांचा ज्वलंत इतिहास हा येणाऱ्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
खरतर आमच्या श्रद्धाने अत्यंत उत्कृष्ट चित्रपटाची निवड करत उत्तम प्रकारे आपली जबाबदारी सांभाळली असून अत्यंत कमी वयामध्ये आगळे वेगळे क्षेत्र निवडत मोठे नाव कमवले असून आम्हाला श्रद्धाचा सार्थ अभिमान वाटतो.