Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज दोस्तीने लावला चूना ! एलआयसीला एकाच दिवसात इतक्या कोटींचा फटका

दोस्तीने लावला चूना ! एलआयसीला एकाच दिवसात इतक्या कोटींचा फटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली । 1 सप्टेंबर 2023 : अमेरिकेच्या दोन फर्म अदानी समूहाच्या चांगल्याच मानगुटीवर बसल्या आहेत. यापूर्वी हिंडनबर्ग रिपोर्ट आणि आता OCCRP च्या रिपोर्टने अदानी समूहाला मोठा फटका दिला. अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) आणि पार्ट-टू-एनर्जीविरोधात OCCRP ने गंभीर आरोप केले आहेत. काल विरोधी पक्षांनी मुंबईत तोच धागा पकडून विरोधाचा सूर आळवला. त्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला. अदानी समूहातील अनेक शेअर्स या घडामोडींमुळे गडगडले. त्याचा फटका भारतीय आर्युविमा महामंडळाला (Life Insurance Company of India- (LIC) पण बसला. सरकारी विमा कंपनीने अदानी समूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांच्या बाजार भांडवल घसरल्याने एलआयसीचे नुकसान झाले. त्यांच्या शेअरचे मूल्य पण घसरले.

अदानी समूहात घसरणीचे सत्र

1. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये अदानी इंटरप्राईजेसचे शेअर 3.51 टक्क्यांनी घसरुन बंद झाला.

2. अदानी टोटल गॅसचा शेअर 2.24 टक्क्यांसह बंद झाला.

3. अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर 3.53 टक्के घसरला 4. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरची किंमत 3.76 टक्के घसरुन बंद झाला. 5. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकोनॉमिक शेअर 3.18 टक्के खाली आला. 6. एसीसी कंपनीचा शेअर 0.73 टक्क्यांनी घसरला.

7. अंबुजा सिमेट्सचा शेअर 3.66 टक्क्यांनी खाली आला. 8. एनडीटीव्हीचा शेअर 1.92 टक्क्यांनी पडला.

9. अदानी पॉवर कंपनीचा शेअर 1.93 टक्क्यांनी घसला. 10. अदानी विल्मरचा शेअर 2.70 टक्क्यांनी खाली आपटला.

किती बसला फटका?

गुरुवारी अदानी समूहाला 35,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. एक्सचेंजच्या आकड्यानुसार, 30 ऑगस्ट 2023 रोजी अदानी समूहातील सर्व 10 शेअरमध्ये घसरण झाली. बाजारातील एकूण भांडवल 10.84 लाख कोटी रुपयांनी घसरले. तर 31 ऑगस्ट रोजी हे नुकसान 10.49 लाख कोटी रुपयांवर पोहचले. एकाच दिवसात अदानी समूहात जवळपास 35,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

एलआयसी बसला इतका फटका

35,000 कोटी रुपयांच्या या नुकसानीत एलआयसी पण एकाच सत्रात 1,439.8 कोटी रुपयांचा वाटा आहे. एलआयसीला इतका फटका बसला आहे. LIC ने अदानी समूहातील सहा कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. डाटानुसार, 30 जून रोजी एलआयसीकडे अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिकमध्ये 9.12 टक्के, अदानी इंटरप्राईजेसमध्ये 4.26 टक्के, अदानी टोटल गॅस, एससीसी आणि अंबुजा सिमेंट्समध्ये 6 टक्क्यांहून अधिकचा वाटा आहे.

काय आहे आरोप

जगातील दिग्गज गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्या ऑर्गेनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (OCCRP) अदानी समूहावर गंभीर आरोप लावले आहेत. फर्मच्या दाव्यानुसार, अदानी कुटुंबियांच्या भागीदारांनी शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी ‘ऑफ शोर’ म्हणजे Opaque फंडचा वापर केला. म्हणजे कुटुंबियांनीच बाहेरुन गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments