Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजदोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर कालव्यात बुडालेल्या सुनीलचा मृतदेह सापडला

दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर कालव्यात बुडालेल्या सुनीलचा मृतदेह सापडला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सोमेश्वरनगर (बारामती): सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात ऊसतोड करण्यासाठी आलेल्या बीड येथील ऊसतोडणी मजूर किसन सव्वाशे यांचा १३ वर्षांचा मुलगा सुनील किसन सव्वाशे हा रविवारी (दि. १५) निरा डावा कालव्यात बुडाला होता. पुण्याच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाला दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर मंगळवारी (दि. १७) त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

नेमकं काय घडलं?

सुनील हा रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान मित्रांसोबत कालव्यावर पोहण्यासाठी गेला होता. त्याने पोहण्यासाठी उडी मारली, त्यानंतर तो पाण्यातून वर आलाच नाही. स्थानिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा शोध लागला नाही. सोमवारी (दि. १६) दुपारी एक वाजता पुणे येथील आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी कालवा परिसरातील मळशी लोखंडी पूल येथे त्याचा शोध घेतला.

रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करूनही सुनीलचा तपास लागलेला नव्हता. मंगळवारी पुन्हा शोध मोहीम सुरू केली. या वेळी कारखान्याच्या मागील बाजूस कालव्यात त्याचा मृतदेह मिळाला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीमचे अधिकारी सुशीलकुमार सेठी यांच्यासह पथकातील २० कर्मचाऱ्यांनी ही शोधमोहीम घेतली. वडगाव निंबाळकर पोलिस व बारामती महसूल विभागाने त्यांना मदत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments