Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजदेहूरोड हादरले! वाढदिवसाच्या रात्री अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, दोघे जखमी; नेमकं काय...

देहूरोड हादरले! वाढदिवसाच्या रात्री अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, दोघे जखमी; नेमकं काय घडलं?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. कायदा व सुव्यस्था राखण्याच्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. अशातच देहूरोडमध्ये गोळीबाराची घटना घडली असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. विक्रम गुरुस्वामी रेड्डी असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. सीसीटीव्हीमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांवर सराईत गुन्हेगार अंदाधुंद फायरिंग करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. या घटनेमध्ये विक्रम रेड्डीचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री वाढदिवसाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या घटनेमध्ये रेड्डीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेड्डी आणि त्याचा सहकारी हे दुचाकीवरून जात होते. त्याच दरम्यान समोर उभा असलेल्या सराईत गुन्हेगाराने त्यांच्यावर गोळीबार केला. याच दरम्यान विक्रम गुरु स्वामी रेड्डीचा मृत्यू झाला आहे. तर इतर एक जण गंभीर जखमी आहे. दरम्यान त्याआधी देखील सराईत गुन्हेगाराने मारामारी केली यामध्ये नंदकिशोर यादव नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर देखील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराचा शोध घेण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments