Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजदेशविरोधी घोषणा देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

देशविरोधी घोषणा देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिक्रापूरः कान्हुर मेसाई (ता. शिरूर) येथील एका फर्निचरच्या दुकानात मजुरी करणाऱ्या कामगाराने ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देत देशाबद्दल अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत वैभव बाळासाहेब चक्कर (वय २८ रा. फलकेवाडी, कान्हर मेसाई ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. तर आरीफ सदरुलवरा सिध्दीकी (वय १९, सध्या रा. कान्हुर मेसाई, ता. शिरूर, मूळ रा. चौरसी, पोस्ट माथर, ता. तुलसीपुरा, जि. बलरामपुर उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

कान्हुर मेसाई येथील न्यू सैफ फर्निचर या फर्निचरच्या दुकानात वैभव चक्कर हा युवक त्याचे फर्निचरचे सुरु असलेले काम पाहण्यासाठी गेला. त्यावेळी आरीफ सिध्दीकी हा युवक हिंदुस्थानाबद्दल अपशब्द वापरत ‘पाकीस्तान जिंदाबाद है और रहेगा, तसेच मैं बाबर का आदमी हूं, हिंदूस्थान मुर्दाबाद है और रहेगा’ अशा घोषणा देत असल्याचे वैभवला दिसल्याने त्याने त्याला पकडत गावातील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळात गावातील स्थानिक नागरिक एकत्र आले. त्यांनी देखील त्याला समज दिली. मात्र, आरीफ सिध्दीकी हा काही ऐकत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ डोंगरे हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments