Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज देवेंद्र फडणवीसांची आमदारकी धोक्यात? महत्वाच्या प्रकरणावर ८ सप्टेंबरला निकाल

देवेंद्र फडणवीसांची आमदारकी धोक्यात? महत्वाच्या प्रकरणावर ८ सप्टेंबरला निकाल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एकीकडे राज्यात राजकीय गुंतागुंत वाढलेली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्याची दिशा ठरविणारा निकाल येत्या ८ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्याप्रकरणावरील याचिकेवर नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी दोन दिवसांत निकाल जाहीर करणार आहेत.

या प्रकरणाचा निकाल आज येणार होता, परंतू तो ८ सप्टेंबरला पुढे ढकलण्यात आला आहे. फडणवीस यांनी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवली, असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी अॅड. सतीश उके यांनी केला आहे. उके यांनी फडणवीस यांची आमदारकी रद्द करावी, या मागणीसाठी काही वर्षांपूर्वी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी याचिका दाखल करण्यासाठी खालच्या कोर्टात जाण्यास सांगितले होते.

या प्रकरणात फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला चालविण्यात यावा, अशी तक्रार उके यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली होती. यावर दोन्ही बाजुंनी युक्तीवाद पूर्ण झाला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात दोन गुन्हे नजरचुकीने नमूद करायचे राहिल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments