Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजदृश्यम स्टाइल केलेला खून गोळीबाराच्या घटनेने उघडकीसः पुण्यात 18 वर्षीय तरुणाच्या खुनाचे...

दृश्यम स्टाइल केलेला खून गोळीबाराच्या घटनेने उघडकीसः पुण्यात 18 वर्षीय तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भावाच्या खुनाचे फोटो स्टेटस ठेवल्याच्या रागातून तरुणाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून १८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केला. तसेच तरुणाचा खून लपविण्यासाठी मृतदेह गुजरात सीमेवर नेत जाळून टाकला. तर त्याचा मोबाईल गोवा येथे पाठविला. खुनाचे स्टेटस बदलून “एन्जॉयनिंग एन गोवा” असे स्टेटस ठेवत खुनाचा सगळा प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला.

पण त्यानंतर दुसऱ्या एकावर गोळीबार केला. त्यामुळे खुनाचे बिंग फोडण्यात पोलिसांना यश आले. आदित्य युवराज भांगरे (१८, रा. भांगरे वस्ती, महाळुंगे) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अजय गायकवाड, अमर नामदेव शिंदे (२५, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) यांना अटक करण्यात आली.

खेड तालुक्यातील रासे फाटा येथे हॉटेल मालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे याच्यावर १८ मार्च रोजी काही जणांनी गोळीबार केला. त्यात स्वप्नील जखमी झाला होता. या प्रकरणी राहुल पवार (रा. महाळुंगे), अजय गायकवाड आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रारंभी पोलिसांनी अजय गायकवाडला अटक केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अमर नामदेव शिंदेला २३ मार्च रोजी अटक केली. मुख्य आरोपी राहुल पवार फरार आहे. राहुलचा भाऊ रितेश याचा तीन महिन्यांपूर्वी खून झाला आहे. त्यात स्वप्नीलचा सहभाग असल्याचा संशय राहुलला होता. त्यामुळे त्याने अभिजित सदानंद मराठे आणि इतर साथीदारांसोबत मिळून स्वप्नीलवर गोळीबार केल्याची कबुली अमर शिंदेंनी पोलिसांना दिली. राहुलने १८ मार्च रोजी स्वप्निल शिंदेवर गोळीबार केला. मात्र, त्यापूर्वी १६ मार्च रोजी आरोपींनी आदित्य भांगरे याचा खून केला. राहुलचा भाऊ रितेशचा खून झाल्यानंतर त्याच्या शरीराचे आदित्य भांगरेने सोशल मीडियावर स्टेट्सला ठेवले होते. त्याचा राग राहुलच्या डोक्यात होता. म्हणून त्याने दोन साथीदारांसोबत मिळून १६ मार्च रोजी आदित्यचा खून केला.

पोलिसांची दिशाभूल…

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी निमगाव येथे एका निर्जन स्थळी काहीतरी जाळून आदित्यचा मृतदेह जाळल्याचा बनाव केला. आदित्यचा मोबाईल फोन गोवा येथे एका आरोपीसोबत पाठवला. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणातआदित्य गोवा येथे असल्याचे दिसत होते. मृतदेह सापडला नाही तर त्याचा न्यायालयात फायदा होईल, असा विचार आरोपींनी केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments