इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : मुंबई-बंगळुर महामार्गावर आज पहाटे गुरुवारी (दि.20) भीषण अपघात झाला आहे. वारजे माळवाडी जवळ असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियन पंपासमोर मुंबई-बंगळुर महामार्गावर पहाटे साडेपाच वाजता टेम्पो ट्रॅव्हलच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव जयश्री वसंता जाधव (वय-24, रा. जोडगाव, ता. मालेगाव जि. वाशिम) आहे. शिवणे येथील एका विद्यालयात जयश्री जाधव या तलाठी पदाची परीक्षा देण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे.
या घटनेसंदर्भात वारजे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी (दि.20) पहाटे एका खड्ड्यात त्यांचे दुचाकी वाहन आदळले आणि जयश्री जाधव या तिघांमध्ये सर्वात मागे बसली होती. यावेळी त्यांची दुचाकी आदळली तेव्हा जयश्री जाधव या रस्त्याच्या उजव्या बाजूला पडली आणि जोरात येणा-या टेम्पो ट्रॅव्हलने जयश्री यांना जोराची धडक दिली, त्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.