Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजदुर्दैवी..! भरधाव वेगाने येणाऱ्या दोन कारच्या अपघातात तिघांचा मृत्यू !

दुर्दैवी..! भरधाव वेगाने येणाऱ्या दोन कारच्या अपघातात तिघांचा मृत्यू !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बीडः जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास दोन कार एकमेकांना धडकल्याने अहमदपूर -अहमदनगर महामार्गावर झाला आहे. या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

अधिक माहिती अशी की, दोन कार एकमेकांना धडकल्याने बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मध्यरात्रीच्या वेळी अहमदपूर अहमदनगर महामार्गावर दोन कार भरधाव वेगाने समोरासमोर धडकल्या. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. आणि या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, एक जणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत केली. तातडीने पोलीस आणि आपत्कालीन सेवेला माहिती कळवली असता. युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments